Monday, July 01, 2024 12:38:22 AM

अमृता आणि संकर्षण यांची ऑन सेट ऑफ स्क्रीन धम्माल !

कायम समाज माध्यमांवर सक्रिय असलेली आणि फॅशन व लाइफस्टाइल सारख्या विषयावर कायम चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतीच समाज माध्यमावर एक भन्नाट रिल शेयर केली आहे.

अमृता आणि संकर्षण यांची ऑन सेट ऑफ स्क्रीन धम्माल  

कायम समाज माध्यमांवर सक्रिय असलेली आणि फॅशन व लाइफस्टाइल सारख्या विषयावर कायम चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतीच समाज माध्यमावर एक भन्नाट रिल शेयर केली आहे. अमृता आणि संकर्षण हे दोघे ड्रामा ज्युनियरचे परीक्षक बनले आहेत आणि या दोघांची ही ऑफ स्क्रीन धम्माल रील सध्या चर्चेचा विषय ठरतेय ! 

अमृता आणि संकर्षण ही जोडी पहिल्यांदा परीक्षण करताना दिसतेय आणि त्यांची ही धमाल मस्ती त्यांच्या समाज माध्यमावरून बघायला मिळत असते अश्यातच अमृता ने संकर्षण सोबत कमालीची  रील पोस्ट करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. व्हिडिओ मध्ये संकर्षण त्याचा कविता मोड मध्ये रमलेला आहे आणि अमृताने यावर त्याला एक विशेष टिप्पणी दिली आहे. 

ज्युनियर च्या ड्रामा मध्ये या दोघांचा खरा ड्रामा देखील प्रेक्षकांना अनुभवयाला मिळतोय. अमृता कायम तिच्या समाज माध्यमावरून  तिच्या नवनवीन कामाचे अपडेट्स देत असते आणि ती असा भन्नाट कंटेंट समाज माध्यमावर नेहमीच शेयर करते. 


 


सम्बन्धित सामग्री